76 वर्षात सोने 89 वरुन 59 हजारांच्या घरात पोहोचले : भारतात फक्त 1 टन उत्पादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आपल्या देशात दरवर्षी 800 टन सोन्याची मागणी होते. यापैकी फक्त 1 टन भारतात उत्पादीत होते आणि उर्वरित सोने अन्य देशांकडून आयात करण्यात येते. सोन्याचा सर्वाधिक वापर चीननंतर भारतात करण्यात येतो. स्वातंत्र्याच्यावेळी म्हणजे 76 वर्षांपूर्वी 1947 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 89 रुपये होता, तो आता 59,000 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच त्याची किंमत 661 पट वाढली असल्याची माहिती आहे. खाणीतून सोने काढून ते शुद्ध केले जाते. सोने सहसा एकटे किंवा पारा किंवा चांदीसह मिश्र धातु म्हणून आढळते. हे कॅल्व्हराइट, सिल्व्हनाइट, पेटाझाइट आणि क्रेनराईट या स्वरूपातदेखील आढळते. आता बहुतेक सोन्याचे धातू खुल्या खड्ड्यांतून किंवा भूमिगत खाणींतून येतात. जेथे सोने पृष्ठभागाच्या थोडे खाली असते तेथे लहान ख•s डायनामाइटने भरुन स्फोट केले जातात. या स्फोटातील तुकडे ट्रकमध्ये भरून सोने काढण्यासाठी पाठवले जातात.
आतापर्यंत 2 लाख टन सोने काढले
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, आतापर्यंत पृथ्वीवरून सुमारे 2 लाख टन सोने काढले गेले आहे आणि आता फक्त 50 हजार टनच शिल्लक आहे. भारतीयांच्या घरांमध्ये अमेरिकन सरकारी तिजोरीपेक्षा 3 पट जास्त सोने आहे.दुसरीकडे, जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, 2019 मध्ये भारतातील घरांमध्ये 25,000 टनांपेक्षा जास्त सोने होते आणि वित्तीय सेवा विभागाच्या ट्रेझरी ब्युरोच्या 2021 च्या आकडेवारीनुसार, 8,000 टनांपेक्षा जास्त सोने आहे. अमेरिकेच्या सरकारी तिजोरीपेक्षा जवळपास तिप्पट सोने आपल्या घरात ठेवले आहे.
76 वर्षात सोने 661 पटीने महागले
आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 76 वर्षात सोनं-चांदी महाग झाले आहे. 1947 मध्ये सोने 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आता 59,000 रुपये आहे. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत त्याची किंमत 661 पटीने वाढली आहे.









