बेळगाव :
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारात तिरंगा झेंड्यांची मागणी वाढली होती. झेंडे, बिल्ले, बॅच, तिरंगा कॉटन, वाहनांवर लावायचे स्टँड झेंडे, कॅप आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. प्रजासत्ताक दिनासाठी बाजारात तिरंगी झेंड्यांसह विविध साहित्यही दाखल झाले होते.
शहरातील पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली यासह इतर ठिकाणी तिरंगा झेंडा आणि इतर साहित्याची विक्री झाली. त्याचबरोबर फेरीवाल्यांच्या गाड्यांवरही तिरंगा ध्वज दिसून आला. बाजारात स्टिकर, बिल्ले, स्टँड फ्लॅग, बॅच, कॉटन कपडा, तिरंगी रंगाचे बँड यासह तिरंगी शर्टची विक्रीही वाढली होती. आकारमानानुसार 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत झेंड्यांच्या किमती होत्या. त्याबरोबरच स्टीकर, स्टँड फ्लॅग यांचे दरही 10 ते 50 रुपयांपर्यंत होते.









