हिंडलगा ग्रामपंचायतला निवेदन
वार्ताहर/हिंडलगा
येथील श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने हिंडलगा ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. या निवेदनात ग्रामपंचायत क्षेत्रात विक्री करीत असलेल्या भाजीविक्रेत्यांकडून कररूपाने ग्रामपंचायत कर्मचारी रक्कम जमा करतो. त्यामध्ये काही विनापरवाना देखील व्यवसाय या ठिकाणी करीत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. तेव्हा या भागात कायमस्वरूपी रक्कम जमा करून टेंडरच्या स्वरूपात आम्हास हे काम दिल्यास बेरोजगार युवकांना सहाय्य केल्यासारखे होईल. तरी याचा ग्रामपंचायतीने विचार करून आम्हास हे कार्य करण्याची संधी द्यावी, अशा मागणीचे निवेदन पंचायत विकास अधिकारी स्मिता चंदरगी यांना देण्यात आले. यावेळी ग्रा. पं. कर्मचारी देवाप्पा जगताप उपस्थित होते. निवेदन देण्यासाठी येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी रुपेश नाईक, प्रवीण देवगेकर, राजू देवगेकर, कार्तिक काकतकर, योगेश नाईक, किशोर पावशे यांचा समावेश होता. या निवेदनाचा स्वीकार पंचायत विकास अधिकारी चंदरगी यांनी केला. हे निवेदन मीटिंगमध्ये ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.









