वर्ष 2047 पर्यंत गाठणार टप्पा
मुंबई
स्टेनलेस स्टीलची देशातील मागणी ही वर्ष 2047 पर्यंत जवळपास दोन कोटी टनपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. 2021-22मध्ये देशामध्ये स्टीलची मागणी 37 ते 39 लाख टन होती. स्टेनलेस स्टील व्हीजन डॉक्युमेंट 2047 च्या अहवालामधून ही माहिती दिली आहे.
प्राप्त अहवालानुसार जागतिक स्टेनलेस स्टील एक्स्पो(जीएसएसई)2022 मध्ये अतिरिक्त सचिव रसिका चौबे यांनी तीन दिवसीय क्रार्यक्रमप्रसंगी विविध विषयांवर माहिती दिली. त्यामध्ये सदरच्या स्टीलच्या मागणीचा उहापोह करण्यात आला.
देशातील पोलाद उत्पादनात तर वाढ होतच आहे. पण पायाभूत सुविधांसह विविध प्रकल्पांच्या उभारणीत होणारी वाढ ही स्टीलची संभाव्य मागणी वाढवणारी असणार आहे. या सगळय़ाचा विचार करता देशातील पोलादाची मागणी ही वाढतीच राहणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये 2040 पर्यंत विक्री 1.25 कोटी टन आणि 2047 पर्यंत 1.27 कोटी टनचा आकडा प्राप्त करण्याची शक्यता आहे. मार्च 2022 पर्यंत भारताची स्टील निर्मितीची क्षमता 66 ते 68 लाख टन होती. हाच आकडा 50 टक्क्यांनी वधारत 2022 मध्ये 56 ते 60 टक्के होऊ शकतो.









