
बेळगाव : हुंचेनहट्टी ते बामणवाडी व्हाया कुट्टलवाडीच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणे केवळ वाहनधारकांनाच नव्हेतर पादचाऱ्यांनासुद्धा अवघड होऊन बसले आहे. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी सातत्याने किरकोळ अपघात होत आहेत. पक्का रस्ता नसल्याने तो सतत ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्यावरून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शिवाय येथे गोदाम असल्याने धान्य घेऊन येणाऱ्या ट्रकची सतत वर्दळ असते. परिणामी या रस्त्यावर ख•s पडले असून तो उखडला गेला आहे. अलिकडेच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु पुन्हा त्याची दुरवस्था झाली असल्याने आता लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वेळीच रस्ता दुरुस्त न झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक व वाहनधारक करत आहेत.









