वार्ताहर/मजगाव
टिळकवाडी काँग्रेस रोडच्या रेल्वे संरक्षण भिंतीवरील झुडपे वादळी पावसामुळे फुटपाथवर आली आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचण होत आहे. दुसरे ते तिसरे रेल्वेगेटपर्यंतच्या संरक्षण भिंतीचे सुशोभीकरण करण्यात आले होते. आठवडाभर झालेल्या सततच्या पावसामुळे संरक्षण भिंतीवरील झुडपे पदपथावर कोसळली आहेत. यामुळे मॉर्निंग वॉकर्सना येथून चालणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्सना फुटपाथ सोडून रस्त्यावरून धोका पत्करून चालावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून त्वरित ही झुडपे हटवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









