नवी दिल्ली:
जानेवारी ते मार्च दरम्यानच्या काळात भारतातील ऑफिस गाळ्यांची मागणी कमी राहिली असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक स्तरावर युव्रेन युद्धासह इतर अस्थिरतेच्या विषयांमुळे ऑफिस गाळ्यांच्या मागणीवर परिणाम झाल्याचे कारण सांगितले जात आहे.
देशातील आघाडीवरच्या 6 शहरांमध्ये ऑफिस गाळ्यांची मागणी 19 टक्के इतकी कमी राहिली आहे. कोलियर्स इंडिया यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्राकडून ऑफिस गाळ्यांची मागणी 22 टक्के इतकी कमी नोंदली गेली आहे. मागच्या वर्षी जानेवारी-मार्च 2022 या कालावधीत ती 34 टक्के राहिली होती.









