प्रतिनिधी /खानापूर
खानापूर-पारिश्वाड रस्ता नव्याने करण्यात आल्याने वाहनचालक सुसाट वाहने चालवत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होत आहेत. खानापूर-पारिश्वाड रस्त्यावर गावकऱयांची वर्दळ तसेच गावकरी रस्त्यावर येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत छोटे-मोठे अपघात होत आहेत.
खानापूर-पारिश्वाड रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असल्याने काही ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी होत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहन चालकांना सूचना देणारे फलक तसेच गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. याच रस्त्यावर बुधवारी सकाळी बलोगा क्रॉस येथे बस व दुचाकी यांच्यातील धडकेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.









