बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अनुसूचित जाती-जमातीच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी वापरण्यात आला नाही. त्यामुळे मागासवर्गीय समाजाला अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. अनुसूचित जाती-जमातींचा राखीव निधी तातडीने वापरात आणावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अनुसूचित जाती-जमातीच्या कोट्यावधी निधींचा वापर करण्याकडे काँग्रेस, भाजप, जेडीएस पक्षाने दुर्लक्ष केले आहे. याचा बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध करण्यात आला आहे. निधीचा सरकारने गैरवापर केला आहे. त्यामुळे शैक्षणिक, वैद्यकीय इतर सुविधांपासून दूर रहावे लागले आहे. या निधीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यमनाप्पा तळवार, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.









