बेळगाव प्रतिनिधी – पावसामुळे सोयाबीन, बटाटा, भुईमूग , पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्यासोबतच कित्तूर, बैलहोंगल, निपाणी, चिकोडी, हुक्केरी परिसरात ही मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा या पिकांचा सर्वे करून एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान झालेली सोयाबीन पीक ट्रॅक्टर मधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणले होते. पत्रकार व अधिकाऱ्यांना नुकसान झालेली सोयाबीन दाखवली. यावेळी आप्पासाहेब देसाई, नामदेव झूडम, शिवाजी बुरली, दुंडप्पा पाटील, हीक्कारा सदावर, रामगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, परसप्पा नंदनवाड, शिवराज पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Previous ArticleKolhapur : दिवसभरात 20 जनावरांना लम्पीची लागण
Next Article Kolhapur : अंबाबाईचे आज दिवसभर दर्शन बंद









