दलित संघर्ष समितीतर्फे निवेदन
बेळगाव : सरन्यायाधीशांवर सुनावणीदरम्यान एका वकिलाने हल्ला केल्याचा प्रकार घडला. हा एकप्रकारे न्यायपालिकेचा अवमान असून, सदर हल्लेखोर वकिलाने असहिष्णुता मानसिकतेतून हल्ला केल्याचे समजते. यामुळे त्याच्यावर त्याला अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दलित संघर्ष समितीतर्फे (आर) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हल्लेखोर वकिलाने हे कृत्य करून संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर वकील जातीवादी मानसिकतेतून सरन्यायाधीशांवर हल्ला केला आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान झाला आहे. त्यामुळे सदर वकिलावर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी. जर असे नाही झाल्यास देशभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी गुंडू तळवार, शशिकांत हुल्लोळ्ळी, बाबासाहेब तळवार, विजय मादर, रमेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









