वृत्तसंस्था/इंग्लड
भारताचे माजी फलंदाज संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांना तृतीयपंथी क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. अनया, ज्याचे पूर्वीचे नाव आर्यन होते. तिने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतरच्या तिच्या खेळाडू म्हणूनच्या प्रवासाची माहिती देणारा आठ पानांचा अॅथलीट चाचणी अहवालाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अनयाने बीसीसीआय आणि आयसीसीकडे असा दावा केला आहे की महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्यास मी पात्र आहे. 23 वर्षीय अनया या खेळाडूने पुढे सांगितले की, विद्यापीठाने तिच्या स्नायूंची शक्ती, सहनशक्ती, ग्लुकोज आणि ऑक्सिजन पातळीचा डेटा गोळा करण्यासाठी एक चाचणी घेतली होती आणि त्यांची तुलना तृतीयपंथी महिला खेळाडूंशी केली आहे.
या चाचणी अहवालांनुसार, हे पॅरामीटर्स तृतीयपंथी महिला खेळाडूंच्या नियमांमध्ये येतात. पहिल्यांदाच, मी एक ट्रान्स महिला खेळाडू म्हणून माझ्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करणारा वैज्ञानिक अहवाल शेअर करत आहे. गेल्या वर्षभरात, हार्मोन थेरपी सुरू केल्यानंतर मी संरचित शारीरिक मूल्यांकन केले आहे. हा अहवाल माझ्या संक्रमणाचा वास्तविक, परिणाम टिपतो, असे तिने म्हटले आहे. सध्या ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्यास पात्र नाहीत. 2023 मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत ही बंदी घालण्यात आली होती. अनाया गेल्या वर्षी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया करून घेतली होती. सध्या ती युनायटेड किंग्डममध्ये राहते.









