नवी दिल्ली :
चीन या देशातून सध्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पोलादाची आयात केली जात असून देशातील पोलाद उत्पादकांनी सरकारला आयातीत पोलादीवर दुप्पट शुल्क आकारण्याची मागणी केली आहे. चीनमधून होणारी पोलादाची आयात एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत 7 वर्षात उच्चांकी दिसून आली आहे. इंडियन स्टील असोसिएशन म्हणजेच आयएसए यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त पोलादावरती 15 टक्के शुल्क आकारण्याची गरज आहे असे पत्रात म्हटले आहे.









