नवी दिल्ली :
1984 च्या शिखविरोधी दंगलीशी निगडित सरस्वती विहारमध्ये दोन शिखधर्मीयांच्या हत्येप्रकरणी दोषी सज्जन कुमार यांच्या शिक्षेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान पीडित पक्ष अन् दिल्ली पोलिसांकडून सज्जन कुमार यांना मृत्युदंड ठोठावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी शिक्षेवरील युक्तिवाद आता 20 फेब्रुवारी होणार आहेत. सज्जन कुमार यांचे वकील दिल्ली पोलिसांच्या लेखी युक्तिवादावर प्रतिवाद करणार आहेत.









