बेळगाव : चावडी गल्ली, वडगाव येथे महापालिकेकडून बोअरवेल खोदण्यात आली आहे. पण त्याठिकाणी बोअरवेलची माती तशीच पडून असल्याने गटारीतून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. पाणी तुंबून राहत असल्याने रहिवाशांना दुर्गंधी व डासांचा सामना करण्याची वेळ आली आहे. मातीमुळे गटारीतील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला असल्यामुळे याबाबतची माहिती स्थानिका नागरिकांनी नगरसेविका रेश्मा कामकर यांना दिली आहे. पण 20 दिवस उलटून गेले तरीही गटारीतील माती काढली नाही. त्यामुळे सांडपाणी तुंबून रस्त्यावर पसरत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
त्यातच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, डासांची समस्याही वाढली आहे. याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गटार स्वच्छतेचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









