अमेरिका, जपानसमवेत 7 देशांनी केली मागणी : तंत्रज्ञान जाणून घेण्याचा उद्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने डागलेले पीएल-15ई क्षेपणास्त्र स्वत:च्या हवाई सुरक्षा यंत्रणेद्वारे नष्ट केले होते. हे क्षेपणास्त्र चीनकडून निर्माण करण्यात आले होते. या क्षेपणास्त्राच्या अवशेषांची तपासणी फाइव्ह आइज देश (अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्युझीलंड) सोबत फ्रान्स आणि जपान करू इच्छित आहेत. हे क्षेपणास्त्र निर्माण करण्यासाठी चीनने कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणून घेणे हा यामागील उद्देश आहे.
9 मे रोजी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात एका शेतात पीएल-15ई क्षेपणास्त्राचे तुकडे मिळाले हेते. यानंतर 12 मे रोजी वायुदलाने पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच याचे अवशेष जगासमोर मांडले होते. पाकिस्तानने जेएफ-17 लढाऊ विमानातून चीनकडून निर्मित पीएल-15ई क्षेपणास्त्र डागले होते, परंतु हे क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट करण्यात आले होते. पहिल्यांदाच कुठल्याही संघर्षात पीएल-15ई क्षेपणास्त्राचा वापर झाला आहे. पीएल-15ई क्षेपणास्त्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या पल्ल्यामुळे चीनकडून हे पाश्चिमात्य देश आणि भारताच्या लढाऊ विमानांसाठी आव्हान असल्याचा दावा करण्यात येतो.
अमेरिकेसह जपानने दाखविली रुची
फाइव्ह आइज देश : अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्युझीलंड हे पाच देश परस्परांमध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करतात. पीएल-15ई च्या अवशेषांची तपासणी करत चीनच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान समजून घेण्याचा या देशांचा प्रयत्न आहे.
फ्रान्स : पीएल-15ई क्षेपणास्त्राचा मुकाबला फ्रान्सच्या राफेल विमानात वापरण्यात येणाऱ्या मीट्योर क्षेपणास्त्राशी असल्याचे मानले जाते. फ्रान्स या क्षेपणास्त्राचे रडार सिग्नेचर, मोटर स्ट्रक्चर आणि गायडेन्स तंत्रज्ञान समजून घेऊ इच्छितो.
जपान : हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे जपान स्वत:च्या क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेला अपग्रेड करू इातो.
हे सर्व देश पीएल-15ई क्षेपणास्त्राचा रडार, मोटर, गायडेन्स सिस्टीम आणि अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे रडार तंत्रज्ञानाला रिव्हर्स इंजिनियरिंगद्वारे जाणून घेऊ इच्छितात.
क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांमुळे महत्त्वपूर्ण माहिती मिळणार
?क्षेपणास्त्राचा रडार कशाप्रकारे काम करतो (रडार सिग्नेचरद्वारे)
?क्षेपणास्त्राच्या इंजिनची कशाप्रकारे निर्मिती (मोटर स्ट्रक्चरद्वारे)
?क्षेपणास्त्राला मार्ग दाखविणारे तंत्रज्ञान (गायडेन्स सिस्टीमद्वारे)
?एईएसए रडारविषयी कळणार
(अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकल स्कॅन्ड एरे)









