खानापूर : खानापूर शहरात तसेच बसस्थानक परिसरात चोरीचे प्रकार वाढले आहेत. बसस्थानकात सीसी कॅमेऱ्यांची सोय नसल्याने चोरांचे फावते आहे. यासाठी तातडीने बस आगारप्रमुखांनी बस डेपो आवारात सीसीटीव्हीची सोय करावी, अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांनी बस आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांना गुरुवारी दिले. यावेळी बस आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत आपण लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. खानापूर बसस्थानक परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी खानापूर बसस्थानकात एका महिलेची पर्स कापून 8 तोळे दागिने लंपास केले. याबाबत पोलीस प्रशासन व बस व्यवस्थापनाने कोणतेच गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे भुरट्या चोरांच्या टोळ्या खानापूर परिसरात सक्रिय झाल्या आहेत. यासाठी बसस्थानक आवारात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. यावेळी नारायण पाटील, धनश्री सावंत, संभाजी पाटील, चंद्रकांत गोरे, काळेशी यरमाळकर, नरसिंग पाटील आदी उपस्थित होते.
Previous Articleपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
Next Article पीक कर्जासाठी एफआयडी सक्तीची









