हुनशाळ ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मुडलगी तालुक्मयातील हुनशाळ गावातील शेतजमिनीच्या उताऱयावरील नावे मुडलगीच्या तहसीलदारांनी बेकायदेशीररित्या कमी केली आहेत. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हुनशाळ येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हुनशाळ येथील शेतजमिनीसंदर्भात खटला सुरू आहे. प्रांताधिकाऱयांनी खटल्याचा निकाल दिला आहे. मात्र त्या विरोधात वरि÷ न्यायालयात दाद मागितली आहे. असे असताना त्या शेतजमिनीच्या उताऱयावरील काही जणांची नावे तहसीलदारांनी परस्पर कमी केली आहेत. याबाबत संबंधित शेतकऱयांना कोणतीही नोटीस किंवा माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांनी केलेले हे कृत्य कायद्याच्या विरोधातील असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हनुमंत विरुपाक्षी, श्रीनिवास पुजारी, नामदेव पुजारी, बसव पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









