बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आता कोरोना नकारात्मक आरटी-पीआरसी चाचणी किंवा लसीकरण अहवाल सोबत असणे आवश्यक असणार आहे.
दरम्यान, डेल्टा प्लस प्रकारांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना नकारात्मक आरटी-पीसीआर प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच कोरोना चाचणी अहवाल ७२ तासांपेक्षा जुना नसावा. तसेच विमानाद्वारे किंवा बस, ट्रेन किंवा रस्ता मार्गे राज्यात येणार्या प्रवाश्यांसाठी कोविड -१९ लसीचा किमान प्रथम डोस घेतल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्रातून विमानाने येणाऱ्या सर्व प्रवाशांना एकतर नकारात्मक आरटी-पीसीआर प्रमाणपत्र किंवा लसीकरण प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.