सुरूवातीची किंमत 1 लाख 57 हजार रुपये : दोन प्रकारात उत्पादने सादर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डेल कंपनीने अलीकडेच लॅपटॉप कम टॅबलेट हे उत्पादन बाजारामध्ये दाखल केले आहे. या उत्पादनामध्ये 13 इंचाची डिस्प्ले स्क्रीन असून 11 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल वेब कॅम असणार आहे.
कंपनीचा एक्सपीएस-13 या नावाने टू-इन-वन टॅबलेट व लॅपटॉप एकत्रित सादर करण्यात आला आहे. दोन प्रकारामध्ये सदरचे उत्पादन उपलब्ध केले असून त्याची सुरुवातीची किंमत एक लाख 57 हजार 980 रुपये इतकी असणार असल्याची माहिती आहे. आय-5 व आय-7 या उत्पादनांमध्ये 16 जीबी रॅमची क्षमता असणार आहे. टॅबलेटमध्ये सिम कार्डचीही सोय करण्यात आली आहे. इंटेल कोअर प्रोसेसरनेयुक्त टॅबलेट कीबोर्डसहीत येणार आहे.
दमदार स्टोरेजची सोय
कंपनीच्या या लॅपटॉपला टॅबलेटमध्ये रूपांतरित करता येण्याची सोय असणार आहे. 4 युएसबी टाइप सी पोर्ट यात असून 2.5 एमएमचा हेडसेट ऍडाप्टर व 45 डब्ल्युचा ऍडाप्टरही असणार असल्याची माहिती आहे. आय-5 मध्ये 512 जीबी इंटरनल स्टोरेज तर आय-7 मध्ये 1 टीबीपर्यंतची इंटरनल स्टोरेजची सोय असेल.
रिलायन्सचा येणार स्वस्तातला लॅपटॉप
4-जी सीमसह देशातला परवडणारा लॅपटॉप रिलायन्स जियो आणणार आहे. सदरच्या लॅपटॉपची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असेल, असे सांगितले जात आहे. अलीकडेच रिलायन्सने क्वॉलकॉम व मायक्रोसॉफ्टशी भागीदारी केली आहे. रिलायन्सच्या जियोकडे सध्याला 42 कोटी ग्राहकांची संख्या आहे.









