नवी दिल्ली
लॉजिस्टिक क्षेत्रातील प्रमुख डेलिव्हरीने एकात्मिक वेअरहाउसिंग आणि वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी हॅवेल्स इंडियासोबत करार केला आहे. डेलिव्हरी यांनी बुधवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
डेलिव्हरीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, त्यांनी पश्चिम विभागातील एकात्मिक पुरवठा साखळी उपायांसाठी हॅवेल्स इंडियाशी करार केला आहे. डेलिव्हरीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी संदीप बरासिया म्हणाले, ‘आम्हाला हॅवेल्सच्या पुरवठा साखळीच्या मोठ्या कार्यप्रणालीसाठी विश्वासू भागीदार झाल्याचा आनंद होत आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत डेलिव्हरीला 89.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागच्या तुलनेत तोटा तसा कमी झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 399.3 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पहिल्या तिमाहीत सेवांमधून कंपनीचे उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढून 1,930 कोटी रुपये झाले आहे.









