काही दिवसातच नवरात्रीचे उपवास सुरु होतील. अशावेळी अनेकदा उपवासाला काय करावे असा बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडत असतो. त्यातच प्रत्येक वेळी साबुदाणा खिचडी, वडा, भगर हे पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही साबुदाण्याची खीर नक्की ट्राय करु शकता.
साहित्य
१ कप साबुदाणा
१ कप साखर
२ कप दूध
वेलची पावडर
काजू
बदाम
पिस्ता
तूप
कृती
सर्वप्रथम साबुदाणा धुऊन एक तास भिजत ठेवावा. त्यानंतर एका भांड्यामधे १ चमचा तूप टाकून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा परतून घ्यावा. नंतर त्यात दूध आणि साखर घालून थोडा वेळ शिजवून घ्यावे. आता त्यात चवीनुसार वेलची पूड घालावी. तुपामध्ये किंवा तेलामध्ये आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता टाळून घ्यावेत आणि नंतर खीरीमध्ये घालून एकजीव करा आणि झटपट होणारी साबुदाण्याची खीर थंड झाल्यावर किंवा गरम गरम देखील खाऊ शकता.









