बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही. लहान मुले तर कोबी खाताना टाळाटाळ करतात. यापासून जर भजी केली तर सगळेच अगदी आवडीने खातील. शिवाय ही भजी झटपट आणि चविष्ट देखील होते. आज आपण ही भजी कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
साहित्य:
१ वाटी बारीक चिरलेली कोबी
२ बारीक चिरलेली मिरच्या
४ चमचे बेसन
१ चमचा कॉर्न फ्लोअर
३ लसणीच्या पाकळ्या
१ चमचा जिरे
अर्धा चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ
तेल
कृती :
सर्वप्रथम एका भांड्यात चिरलेला कोबी घ्या. आणि त्यात थोडे मीठ घाला,ज्यामुळे थोडे पाणी सुटेल. यानंतर मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात.अन कोबीमध्ये ही पेस्ट घाला. यांनतर त्यामध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवा. तेल गरम करून भजी लालसर तळून घ्या. भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत जेणेकरून भजी आतमध्ये कच्ची राहणार नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









