ऑनलाईन टीम/तरुण भारत
Delhi Murder Case : श्रद्धा वालकर खून प्रकरणात (Shraddha Murder Case) रोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धाचा बॉयफ्रेड आफताब अमीन पुनावालाने (Aftab Poonawalla) खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत त्याची विल्हेवाट लावली. आफताब पूनावालाने पोलिसांकडे आपल्याला गांजाचं व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. आफताब नशेत श्रद्धाला मारहाण करायचा मात्र ती हे सर्व सहन करुन नातं टिकवण्यासाठी धडपड करत होती. या प्रकरणात आता श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा दिसत आहेत. सहा महिन्यांपूर्वी आफताबने केलेला गुन्हा अखेर समोर आला. पोलिसांकडून या प्रकरणात तपास आणि फॉरोन्सिकच्या मदतीन पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत.
आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, श्रद्धा आपल्याला नेहमी गांजाचं व्यसन करत असल्याने ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्च तसंच मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण सुरु होतं. या भांडणानंतर आफताब घराबाहेर गेला आणि गांजाचं सेवन करुन परतला. आपण श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचं सेवन केलं असल्याने त्याच्या प्रभावाखाली आपल्या हातून गुन्हा घडला असा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे.
.
दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत पोलीस ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी आता श्रद्धाचे फोटो समोर आले असून, त्यामुळे आरोपी आफताबची क्रूरता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. हा फोटो श्रद्धाच्या मित्राने समोर आणला आहे. ज्यामध्ये आफताबने श्रद्धाला केलेल्या मारहाणीनंतरच्या जखमा दिसत आहेत. फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा स्पष्ट दिसत आहेत. हा फोटो पाहून आफताबने श्रद्धाला किती बेदम मारहाण केली होती याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हा फोटो डिसेंबर २०२० मधील आहे.