वृत्तसंस्था/ शाखापट्टणम
गेल्या मोसमातील कर्णधारांनी संघ बदललेले असताना आणि संघात मोठे फेरबदल केलेले असताना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली सोमवारी येथे आमनेसामने येतील तेव्हा आपल्या आयपीएल मोहिमेची मजबूत सुऊवात करण्यास ते उत्सुक असतील.
सलग दुसऱ्या वर्षी येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रे•ाr एसीए-व्हीडीसीए स्टेडियम दिल्ली कॅपिटल्ससाठी दोन ‘होम’ लढती आयोजित करेल. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू आणि त्यांचा कर्णधार राहिलेल्या पंतने गेल्या वर्षी मेगा लिलावापूर्वी संघ सोडला आणि एलएसजीने त्याला 27 कोटी ऊपयांच्या विक्रमी किमतीत करारबद्ध केले. या रकमेमुळे या हंगामात हा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज चर्चेत राहील. परंतु अलीकडेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला एकही सामना मिळाला नाही. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्याला सिद्ध करून दाखविण्याची एक संधी त्याला मिळेल.
दुसरीकडे आयपीएलमध्ये पदार्पणापासून दोन वर्षे एलएसजीचे नेतृत्व केलेला के. एल. राहुल दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला आहे. तिथे तो त्यांच्या योजनांमध्ये कर्णधार म्हणून नव्हे, तर प्रमुख फलंदाज म्हणून एक महत्त्वाचा खेळाडू असेल. भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला दिल्लीचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे फलंदाजीत फाफ डु प्लेसिसच्या प्रचंड अनुभवासोबत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क देखील आहे. कऊण नायरमुळे दिल्लीची मधली फळी आणखी धोकादायक वाटते. राहुल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी आणि आशुतोष शर्मा हे देखील या संघात आहेत. दिल्लीने त्यांच्या गोलंदाजीलाही बळकटी दिली आहे. त्यात आघाडीचे भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि कुलदीप यादव, तर वेगवान गोलंदाज म्हणून टी. नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार आणि दुष्मंथा चमीरा यांचा समावेश आहे.
एलएसजीकडे मिशेल मार्शसारखा फलंदाज असून त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर आणि मार्करम जोडीकडून चांगल्या अपेक्षा असतील. निकोलस पूरनच्या रूपात एलएसजीकडे एक परिपूर्ण आक्रमक फलंदाज आहे. तथापि, गोलंदाजी हे चिंतेचे कारण आहे. कारण त्यांचे भारतीय वेगवान गोलंदाज मयंक यादव, आवेश खान आणि आकाश दीप हे दुखापतींतून सावरत आहेत. तथापि, शार्दुल ठाकूरच्या समावेशामुळे एलएसजीला बळकटी मिळाली आहे.
संघ : दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, कऊण नायर, फाफ डु प्लेसिस, डोनोव्हन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, विपराज निगम, अजय मंडल, मानवंथ कुमार, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रीट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आयुष बदोनी, आवेश खान, आकाश दीप, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, आकाश सिंग, शामर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, मोहसिन खान, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









