26.463 किमीच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरचा मार्ग मोकळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे दिल्लीवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पांतर्गत 9.5 लाख कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो फेज-4 प्रकल्पाच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. याची एकूण लांबी 26.463 किमी आहे. या कॉरिडॉरमुळे राष्ट्रीय राजधानी आणि शेजारील हरियाणा यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. ही लाईन सध्या कार्यरत असलेल्या शहीद स्थळ (नवीन बस स्टँड) रिठाळा (रेड लाईन) कॉरिडॉरचा विस्तार असेल आणि राष्ट्रीय राजधानीच्या उत्तर-पश्चिम भागातील नरेला, बवाना, रोहिणीचा काही भाग इत्यादींमध्ये संपर्क वाढवेल. या संपूर्ण मार्गावर 21 स्थानके असतील. या कॉरिडॉरची सर्व स्टेशन्स एलिव्हेटेड असतील.









