एका महिन्यात तिसऱ्यांदा महापौर निवडीविना दिल्ली महानगरपालिकेचे सभागृह तहकूब झाल्यानंतर आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायलयात जाणार आहे. या संदर्भातील माहीती दिल्ली आम आजमी पक्षाचे नेते आतिशी यांनी दिली. न्यायालयाच्या देखरेखीखाली महापौर पदाच्या निवडणुकांसाठी पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यांना मतदान करू देण्यावरून गदारोळ झाला. त्यामुळे सोमवारी महापौरपदाची निवड होऊ शकली नाही.
दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) सभागृह कामकाज चालु झाल्यानंतर पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी सभापती या पदांच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठांना मतदान करण्याची परवानगी दिली जाईल असे जाहीर केले. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी या गोष्टीचा निषेध केला. सभागृहाचे ज्येष्ठ नागरिक या निवडणुकीत मतदान करू शकत नसल्याचा दावा ‘आप’चे नेते मुकेश गोयल यांनी केले.
गदारोळात सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आपचे नेते आतिशी यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले, “आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून दिल्ली महापौरपदाची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.”
यापुर्वी 6 जानेवारी आणि 24 जानेवारीला झालेल्या सभागृहाची पहिली दोन्ही सत्रे भाजप आणि ‘आप’च्या सदस्यांमधील गदारोळ आणि जोरदार बाचाबाचीनंतर पीठासीन अधिकाऱ्याने महापौर न निवडता तहकूब केली होती. दिल्ली महानगरपालिका (DMC) कायदा, 1957 नुसार, महापौर आणि उपमहापौर यांची निवड नागरी निवडणुकीनंतर सभागृहाच्या पहिल्याच सत्रात होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका निवडणुका होऊन दोन महिने झाले तरी दिल्लीला अद्याप महापौर मिळालेला नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









