वृत्तसंस्था/नारायणपूर (छत्तीसगड)
येथे सुरू असलेल्या 2025 च्या स्वामी विवेकानंद पुरुषांच्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विद्यमान विजेत्या दिल्लीने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिल्लीने छत्तीसगडचा 8-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात दिल्लीने 7 गोल नोंदविले. दिल्लीतर्फे राजेश्वरसिंग, आदित्य अधिकारी, राहुल मेताई यांनी प्रत्येकी 2 गोल तर संकिल, अर्मान यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.









