प्रतिनिधी /बेळगाव
स्पाईसजेट या विमान कंपनीने बेळगावमधून दिल्या जाणाऱया विमान फेऱयांच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला आहे. दिल्ली-बेळगाव-दिल्ली, हैदराबाद-बेळगाव-हैदराबाद व मुंबई-बेळगाव-मुंबई या विमानफेऱयांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला. रविवार दि. 25 सप्टेंबरपासून हा बदल करण्यात आला असून यामुळे प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.
दिल्ली-बेळगाव विमान सकाळी 10.15 वा. दिल्ली येथून निघणार असून 12.25 वा. बेळगावला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात दुपारी 1.10 वा. बेळगाव येथून निघालेले विमान दुपारी 3.30 वा. दिल्लीला पोहचेल. हैदराबाद-बेळगाव विमान सकाळी 9.45 वा. हैदराबाद येथून निघून सकाळी 11 वा. बेळगावला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात सायंकाळी 5.50 वा. बेळगावमधून निघालेले विमान रात्री 7.15 वा. हैदराबाद येथे पहोचणार आहे.
बेळगाव-मुंबई विमान दुपारी 11.20 वा. बेळगावमधून निघणार असून 12.40 वा. मुंबई विमानतळावर पोहचेल. तर सायंकाळी 4.20 वा. मुंबई येथून निघालेले विमान सायंकाळी 5.30 वा. बेळगाव येथे पोहचेल. रविवारपासून वेळापत्रकात बदल करण्यात आला असून यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.









