वृत्तसंस्था / दिल्ली
रविवारी येथे विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेस अंतर्गत दिल्ली हाफ मॅरेथॉन आयोजित केली असून या मॅरेथॉनमध्ये देशातील आणि विदेशातील अव्वल नामांकित धावपटू सहभागी होत आहेत.
युगांडाची दुहेरी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जोशुआ चेपतेगी, इथोपियाचा मुक्तार इद्रीस तसेच युगांडाचे अन्य काही धावपटू सहभागी होत आहेत. 2008 नंतर पहिल्यांदाच चेपतेगीचे भारतात या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन होत आहे. 2008 साली तिने भारतात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. महिलांच्या विभागात इलीस मॅक्लोग्लेन, केनियाची सिंचीया लीमो यांच्यात जेतेपदासाठी चुरस राहिल. दिल्ली हाफमॅरेथॉनला येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमपासून प्रारंभ होणार असून विविध गटातील विजेत्यांसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 260,000 अमेरिकन डॉलर्स ठेवण्यात आली आहे.









