दररोज 350 ते 370 प्रवासी : एप्रिलमध्ये 34 हजार प्रवाशांचा विमान प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-दिल्ली विमानफेरीला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. एप्रिल महिन्यात तब्बल 34 हजार 689 प्रवाशांनी प्रवास केला. यातील अधिकाधिक प्रवासी हे दिल्ली विमानफेरीचे असल्याने बेळगावला ही विमानफेरी सर्वात महत्त्वाची ठरत आहे. दररोज 350 ते 370 प्रवासी दिल्ली विमानाने ये-जा करीत आहेत.
कोरोनानंतर विमान प्रवास करणाऱयांची संख्या वाढत आहे. मागील वर्षांत बेळगाव विमानतळ प्रवासी संख्येत राज्यात तिसऱया क्रमांकावर आहे. बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर बेळगावमध्येच सर्वाधिक विमान प्रवासी आहेत. देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांचा ओढा बेळगावला आहे. त्यातच बऱयाचशा विमानफेऱया या उडान-3 अंतर्गत मंजूर असल्याने माफक दरात प्रवास करणे सोयीचे ठरले होते.
फेब्रुवारी महिन्यात विमानतळावरून 23 हजार 84 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. मार्च महिन्यात 30 हजार 467 प्रवाशांनी विमान प्रवास केला. तर एप्रिल महिन्यात 34 हजार 689 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. एप्रिल महिन्यात प्रवासी संख्येत 14 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. सध्या दिल्लीवरून 189 प्रवासी वाहतूक करणारे बोईंग विमान दाखल होत आहे.
बऱयाच वेळा हाऊसफुल विमान दाखल होत असल्याने प्रवासी संख्या वाढत आहे. केवळ बेळगावच नाही तर हुबळी, सांगली, कोल्हापूर, कोकण येथूनही प्रवासी दिल्ली विमानफेरीसाठी बेळगावमध्ये दाखल होत आहेत.
या शहरांना सुरू आहे विमानफेरी
दिल्ली, नागपूर, बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, अहमदाबाद, इंदूर, सूरत, तिरुपती, जोधपूर.
भविष्यात अजून प्रवाशी वाढतील
बेळगावमधून देशातील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. दिल्ली विमानफेरीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रवासी ये-जा करीत आहेत. प्रवासी संख्या येणाऱया काळात अजून वाढेल, असे त्यांनी सांगितले.
– राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)









