वृत्तसंस्था/ कल्याणी (पश्चिम बंगाल)
2023 च्या आय लिग फुटबॉल हंगामातील येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंटर काशी संघाने दिल्ली एफसी संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
या सामन्यात इंटर काशी संघातर्फे मोहम्मद असिफने 14 व्या मिनिटाला तर जॉर्डन लामेलाने 36 व्या मिनिटाला गोल केले. स्पेनच्या लामेलाचा हा या स्पर्धेतील चौथा गोल आहे. या स्पर्धेत आता इंटर काशी संघ 10 सामन्यातून 14 गुणासह सहाव्या स्थानावर आहे. तर दिल्ली एफसी संघाने 10 सामन्यातून 13 गुणासह आठवे स्थान मिळविले आहे.









