लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यूज न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, राबडी देवी, त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती यांना मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना जामीन मंजूर केला आहे.
लँड फॉर जॉबशी संबंधित हे प्रकरण 2004 ते 2009 या काळात लालूप्रसाद यांच्या रेल्वेमंत्री असतानाच्या कालावधीतील आहे. याचदरम्यान मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागातील गट-डी नियुक्त्यांमध्ये लालू कुटुंबीय किंवा सहकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा दावा करण्यात आला होता. 18 मे 2022 रोजी सीबीआयने लालू यादव आणि त्यांची पत्नी, दोन मुली आणि अज्ञात सरकारी कर्मचारी आणि खासगी व्यक्तींसह अन्य 15 जणांविऊद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सीबीआयने गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये लालूप्रसाद, राबडी देवी आणि इतरांविऊद्ध या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल केले होते.









