वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सर्व्हरमध्ये अचानक बिघाड झाल्याने या संस्थेच्या बऱ्याच ऑनलाईन सेवा प्रभावित झाल्याचे वृत्त आहे. सर्व्हर अचानक मंदावल्याने ऑन लाईन यंत्रणा विस्कळीत झाली. ऑन लाईन सेवा बाधित झाल्याने रुग्णांना मोठाच त्रास सहन करावा लागला आहे. गेल्यावर्षी 6 जूनला या संस्थेच्या संगणकीय यंत्रणेवर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा हल्ल्याचा प्रयत्न पूर्णत: विफल करण्यात आला होता.









