न्हावेली /वार्ताहर
तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये स्थानिक पातळीवर आहाराचा विचार केला जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. पंतप्रधान पोषण आहार योजनेअंतर्गत वेळेवर धान्याचा पुरवठा होत नसल्याने शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे भात व आमटी असा आहार देण्यात येत आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील विविध पदार्थांचा समावेश न केल्याने विद्यार्थ्यांचे योग्य पोषण होऊ शकत नाही,अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.तसेच या योजनेशी संबंधित नोंदी व ऑनलाइन माहिती भरण्याचे अतिरिक्त काम शिक्षकांवर टाकण्यात आल्याने त्यांना अध्यापनासोबत इतर कामांत गुंतावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.स्थानिक पातळीवरील आहार पद्धतीनुसार शालेय पोषण आहाराचे मेनू देण्यात यावेत व शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा भार कमी करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.









