वृत्तसंस्था/ डब्लिन
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया 2023 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट आयर्लंडने आपल्या देशाच्या संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये रिबेका स्टोकेलचा समावेश करण्यात आला होता पण ती जखमी असल्याने तिच्या जागी आता रॅचेल डिलेनीला संधी देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी आयर्लंडच्या महिला संघाने आपली पात्रता सिद्ध करताना पात्र फेरीच्या स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आयर्लंडने विजय मिळवला होता. स्टोकेलच्या शानदार कामगिरीमुळे आयर्लंडने हा विजय संपादन केला होता पण तिच्या पायच्या तळव्याला दुखापत झाली असून ती पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिला संघातून वगळावे लागले आहे असे निवड समिती प्रमुख कॅरी आर्चर यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड संघाचा सलामीचा सामना 13 फेब्रुवारीला इंग्लंडबरोबर होणार आहे. आयर्लंडच्या गटामध्ये भारत, पाकिस्तान आणि विंडीज यांचाही समावेश आहे. आयर्लंड संघाचे नेतृत्व लॉरा डिलेनीकडे सोपवण्यात आले आहे.
आयर्लंड संघ – लॉरा डिलेनी (कर्णधार), जॉर्जिना डिम्पेसी, ऍमी हंटर, शॉना कॅव्हेनेग, आर्लेनी केली, गॅबि लेव्हिस, लुसी लिटल, सोफी मॅकमोहन, जेनी मॅग्युरी, केरा मरे, ली पॉल, पोर्ला प्रेंडरगेस्ट, इमेर रिचर्डसन, मेरी वेलड्रॉन आणि रॅचेल डिलेनी.









