Degwe villagers protest against Gale Gans company
डेगवे गावातील श्री स्थापेश्वर मंदिराच्या समोरच्या ओहळावर इंडिया गेल गँस पाईपलाईन टाकत असताना तेथील पाण्याचा वापर कोणालाही न विचारता ५ हाँर्सपाँवर असलेला मोटरपंप लावल्याने डेगवे-जांभळवाडीतील बाग-बागायतदारांना , व शेतीला पाणी मिळणे दुरापास्त झाले होते.शिवाय तेथील घाणेरड्या पाण्यामुळे गुरांना,व माणसाच्या जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत होती.त्यामुळे या बाबतीत डेगवे ग्रामपंचायतीचे जागृत सदस्य श्री विजय देसाई व महिला सौ.श्रेया देसाई यांनी सदर काम करणाऱ्या लोकांना रोखून धरले असता;तेथे ग्रामपंचायतीचे जबाबदार लोकप्रतिनिधी येऊन ते काम सुरू करा असे सांगितले.
तेव्हा पुन्हा याबाबत कंपनीच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला विचारले .असता ग्रामपंचायतीच्या जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी ग्रामस्थांचा विरोध असतानाही सदर काम करण्यासाठी सांगितले आहे.असे सांगितले. त्यामुळे सदर बाबतीत तेथील ग्रामस्थानी संताप व्यक्त करुन सदर प्रश्नावर श्री विजय देसाई व सौ.श्रेया देसाई यांच्या अथक प्रयत्नाने सदर ठिकाणी शेषखड्याची मागणी केली .व ती आता कंपनीने पुर्ण केली आहे.सदर तक्रारी बाबतीत आवर्जून लक्ष दिल्याबाबतीत व तेथील काम करून घेतल्या बाबत जागृत सदस्य विजय देसाई व जागृत महिला सौ.श्रेया देसाई यांचे सर्व ग्रामस्थ कौतुक करीत आहेत.
बांदा,( प्रतिनिधी)









