सावंतवाडी / प्रतिनिधी
Degwe-Phansawadi bridge work in progress!
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे फणसवाडी येथील जुन्या सोसायटीच्या जवळील उमाळकर यांच्या बागेतील ओहळावरिल पुल नादुरुस्त झाला होता.त्यामुळे सदरील ओहळावरिल पुलाचे फेरदुरुस्तीच्या काम तातडीने करण्याची मागणी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायतीने केली होती.व ती मंजूर केली होती.त्यामुळे सदरील काम सुरू झाले असून प्रगती पथावर आहे .मात्र सदर ठिकाणी असलेल्या ओहळावरिल पुलाचे काम त्यावेळी राहिले होते.सदर काम आता ठेकेदारांने सुरु केलेआहे.त्याची प्रत्यक्ष पहाणी करताना डेगवे ग्रामपंचायतीचे तरुण तडफदार सदस्य विजय देसाई छायाचित्रात दिसत आहेत.
सदर पुलाला डेगवे गावातील, जमीनदारांनी आपली बहूमोल जमीन शासनास विनामूल्य देऊन दातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे.शिवाय अतिदुर्गम भागात विकासासाठी सहकार्य केले आहे.त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीस व शासनास सहकार्य केले आहे.त्या बध्दल सर्व संबंधीत शासकीय अधिकारी यांचे व समाजातील सर्व लोकप्रतिनिधीचे आभार व्यक्त केले आहेत.