सावंतवाडी / प्रतिनिधी
बांदा दोडामार्ग मार्गावर डेगवे- पानवळ येथे रस्ता पहिल्याच पावसात कोसळला आहे. हा रस्ता येणाऱ्या पावसात अधिकच खचून बांदा दोडामार्ग मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. गॅस पाईपलाईन साठी करण्यात आलेल्या खुदाईमुळे हा रस्ता खचला आहे असा आरोप शिवसेना विभाग प्रमुख विजय देसाई यांनी केला आहे. खचलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्त करावा तसेच या ठिकाणी संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी त्यांनी केली आहे.









