सावंतवाडी / प्रतिनिधी
Degwe-Ambekhanwadi bridge construction on track; Satisfied villagers!
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे आंबेखणवाडी डिंगणे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर झाला आहे.त्यामुळे सदर रस्त्याचे खडीकरण व डाबंरीकरणा सहित काम पुर्ण झाले आहे.मात्र सदर रस्त्यावर असलेल्या आंबेखणवाडीच्या ओहळावरिल पुलाचे काम काही काळ प्रलंबित राहिले होते.सदर काम आता ठेकेदारांने सुरु केलेअसून त्यावर स्लँब टाकून घेतला आहे.त्याची प्रत्यक्ष पहाणी करताना डेगवे ग्रामपंचायतीचे तरुण तडफदार सदस्य तथा इन्सुली शिवसेना उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई यांनी आज प्रत्यक्ष पहाणी करुन सदर काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधीत इंजिनिअर दिलीप नार्वेकर यांच्याशी संवाद साधला आहे.त्यामुळे सदर पुलाचे काम अल्पावधीतच म्हणजे येत्या १५ दिवसात काम पुर्ण करून वहातुकीस खुला केला जाईल असे सांगितले आहे.
सदर रस्त्याला डेगवे गावातील, व डिंगणे गावातील जमीनदारांनी आपली बहूमोल जमीन शासनास विनामूल्य देऊन समाजासमोर एक दातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे.शिवाय अतिदुर्गम भागात असलेल्या या रस्त्याच्या विकासासाठी ज्यानी,त्यांनी प्रथमदर्शनी सहकार्य केले आहे.त्यां ग्रामस्था मुळे सदर रस्ता झाला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीस,व शासनास त्यांनी फारमोठे सहकार्य केले आहे.त्या बध्दल सर्व संबंधीत शासकीय अधिकारी यांचे व समाजातील सर्व लोकांचे आभार व्यक्त केले आहेत.









