सावंतवाडी / प्रतिनिधी
Degway-Phansawadi bridge work started; Villagers satisfied
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे फणसवाडी येथील जुन्या सोसायटीच्या जवळील उमाळकर यांच्या बागेजवळीलओहळावरिल पुल नादुरुस्त झाला होता.त्यामुळे सदरील ओहळावरिल पुलाचे फेरदुरुस्तीच्या काम तातडीने करण्याची मागणी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायतीने केली होती.व ती मंजूर केली होती.त्यामुळे सदरील काम आता सुरू झाले असून प्रगती पथावर आहे .मात्र सदर ठिकाणी असलेल्या ओहळावरिल पुलाचे काम त्यावेळी राहिले होते.सदर काम आता ठेकेदारांने जलदगतीने सुरु केलेआहे.त्याची प्रत्यक्ष पहाणी करताना डेगवे ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे तरुण तडफदार सदस्य विजय देसाई यांनी केली.
पुलामुळे डेगवे गावातील,आंबेखणवाडी,जांभळवाडी,व फणसवाडीतील ग्रामस्थांना गावातील मुख्य रस्त्यावर जा-ये करण्यासाठी जवळचे अंतर पडणार आहे.त्यामुळे ग्रामस्थ समाधानी आहेत.संबंधीत पुलाच्या बांधकामासाठी व रस्त्यासाठी संबंधीत जमीनदारांनी आपली बहूमोल जमीन विनामूल्य देऊन गावातील लोकासमोर एक दातृत्वाचा नवीन आदर्श घालून दिला आहे.शिवाय अतिदुर्गम भागात विकासासाठी सहकार्य केले आहे.त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीस व शासनास सहकार्य आहे.त्या बध्दल सर्व संबंधीत अधिकारी यांचे सर्व लोकप्रतिनिधीचे आभार ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी व्यक्त केले आहेत.









