बेंगळूर : विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्कात 10 टक्के वाढ करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यापीठांनी सादर केलेल्या प्रस्तावाला उच्च शिक्षण खात्याने हिरवा कंदील दाखविला आहे. कोविड संसर्गापूर्वी सादर करण्यात आलेला प्रस्ताव सरकारने रोखून धरला होता. विद्यापीठांना आर्थिक समस्या उद्भवत असल्याने शुल्कवाढीला परवानगी द्यावी, अशा विनंतीचा फेरप्रस्ताव सर्व विद्यापीठांनी सादर केला होता. आता विविध विषयांसाठी प्रवेशाकरिता असणाऱ्या शुल्कात 10 टक्के वाढ करण्यास संमती देण्यात आली आहे. यामुळे बीए, बी.कॉम, बीएससीसह विविध पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागू शकतात.
Previous Articleठेकेदार नको, कचरा प्रकल्प मनपानेच चालवावा! भाजप- ताराराणी आघाडीची मनपा प्रशासकांकडे मागणी
Next Article वजनात फसवणूक केल्यास कारखान्यांची परवानगी रद्द









