झोप पूरी न झाल्याने अनेक समस्या होतात, मानवी मेंदू योग्यप्रकारे काम करू शकत नाही. परंतु झोपेअभावी मेंदू का काम करत नाही या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. मानवी मेंदूत एक प्रोटेक्टिव्ह प्रोटीन असतो, ज्याची पातळी झोप पूर्ण न झाल्याने कमी होते. तसेच झोप न झाल्याने मेंदूचा मेमरी हब असलेल्या हिप्पोकॅम्पसलाही नुकसान पोहोचते, यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होतात असे एका अध्ययनात दिसून आले आहे.

प्लियोट्रोफिन प्रोटीनची कमतरता हिप्पोकॅम्पसमध्ये तयार होणाऱ्या पेशी संपविते. झोप पूर्ण न झाल्याने मेंदूत होणारे बदल समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी उंदरांवर प्रयोग केला आणि मग प्रोटीनची कमतरता आणि आरएनएत होणाऱ्या बदलांचे परीक्षण पेले. सर्वप्रथम वैज्ञानिकांनी उंदरांना दोन दिवसांपर्यंत झोपू दिले नाही. यानंतर नव्या गोष्टी आठवणीत ठेवण्याची क्षमता पडताळून पाहिली. झोप न झालेल्या उदंरांच्या हिप्पापॅम्पी (मानवी मेंदूत हिप्पोपॅम्पस) मध्ये तयार होणारे प्रोटीन बाहेर काढले आणि त्या प्रोटीनमध्ये झालेल्या बदलांची ओळख वैज्ञानिकांनी पटविली.
यानंतर या प्रोटीन्सच्या डाटाची तुलना भरपूर झोप घेतलेल्या उंदरांच्या प्रोटीन्सशी केली. यातून कमी झोप घेणाऱ्या उंदरांमध्ये प्लियोट्रोफिन नावाच्या प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी होते असे आढळून आले. हेच प्रोटीन माणसांच्या हिप्पोकॅम्पसमध्ये देखील असते. याच्या कमतरतेमुळे हिप्पोपॅम्पसमध्ये तयार होणाऱ्या पेशी मरू लागतात आणि मेंदू योग्यप्रकारे काम करू शकत नाही. मग संबंधित व्यक्ती गोष्टी आठवू शकत नाही. याचमुळे डीप स्लीप अत्यंत आवश्यक असते. गाढ झोपेदरम्यान एकवेळ मेंदूची स्मरणशक्ती वाढत असते. संशोधकांनी या अध्ययनासाठी क्लोज लूप सिस्टीमची मदत घेतली होती. या सिस्टीममध्ये मेंदूच्या एका हिस्स्यात डिलिव्हर होणाऱ्या इलेक्ट्रिक प्लसला दुसऱ्या हिस्स्यात स्टोर मेमरीसोबत मर्ज करते.
झोपेदरम्यान मेंदूचा मेमरी हब असलेला हिप्पोकॅम्पस आणि तर्क करणारा सेरेब्रल कोर्टेक्स परस्परांमध्ये संवाद साधतात. हा प्रकार गाढ झोपेदरम्यान होतो, त्याक्षणी मेंदूच्या विविध हिस्स्यांमधील न्यूरॉन्स परस्परांच्या माहितीचे आदानप्रदान करत असतात असे संशोधकांनी सांगितले.









