वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या गतविजेत्या जॅनिक सिनर आणि आर्यना साबालेंका यांनी या वर्षाच्या जाहीर झालेल्या स्पर्धेच्या प्रवेश यादीत असलेल्या यूएस ओपनमध्ये 10 माजी विजेत्यांचे नेतृत्व केले.
यूएस टेनिस असोसिएशनने म्हटले आहे की, या स्पर्धेत 18 माजी ग्रँडस्लॅम एकेरी विजेत्यांचा समावेश आहे. टेनिस हंगामाच्या अंतिम प्रमुख स्पर्धेत थेट प्रवेश 14 जुलैपर्यंतच्या क्रमवारीवर आधारीत होता. कटऑफ पुरुषांच्या 101 व्या आणि महिलांसाठी 99 व्या क्रमांकावर होता. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकाच्या कार्लोस अल्कारेझला हरवून सिनेरने त्याचे चौथे ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद पटकाविले. साबालेंका उपांत्य फेरीत अमांडा अनिसिमोव्हाकडून पराभूत झाली. जी सातव्या क्रमांकावर आहे आणि टॉप 8 मध्ये स्थान मिळविणाऱ्या चार अमेरिकन महिलांपैकी एक आहे. अमेरिकेने सर्व देशांमध्ये आघाडी घेतली. 30 खेळाडू (16 महिला, 14 पुरुष) थेट प्रवेश मिळवला. पात्रता मिळविण्यासाठी विशेष किंवा संरक्षित रँकिंग वापरणाऱ्या खेळाडूंमध्ये निक किंर्गीओस, पेट्रा क्विटोवा आणि सोराना सिर्स्टिया यांचा समावेश आहे. यूएस ओपन स्पर्धा 24 ऑगस्टपासून सुरु होत आहे.









