वृत्तसंस्था /सॅन दियागो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सॅन दियागो महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ट्युनेशियाची टॉप सिडेड ऑन्स जेबॉरला अॅनेस्तेशिया पोटापोवाकडून अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेत बुधवारी खेळवण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात 27 व्या मानांकित पोटापोवाने ट्युनेशियाच्या सध्याच्या मानांकनातील सातव्या स्थानावर असलेल्या जेबॉरचा 6-4, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळवला. जेबॉरला अलीकडेच झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत हार पत्करावी लागली होती. अन्य एका सामन्यात सोफिया किनेनने आपल्याच देशाच्या व्हॉलीनेट्सचा 1-6, 6-4, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.









