वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एएफसी चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मुंबई सिटी एफसी संघाला पहिल्याच सामन्यात इराणच्या नवोदित नासाजी माझनदरन क्लबकडून पराभव पत्करावा लागला. इराणच्या या क्लबने मुंबई सिटी एफसी संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 34 व्या मिनिटाला एहसान हुसेनीने नेसाजी माझनदरन क्लबचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत इराणचा हा क्लब 1-0 असा आघाडीवर होता. 62 व्या मिनिटाला मोहमदेजा आझादीने इराण क्लबचा दुसरा गोल केला. या सामन्यात मुंबई एफसी संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. इराण संघाच्या गोलरक्षकाकडून भक्कम गोलरक्षण झाल्याने मुंबई सिटी एफसी संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.









