वृत्तसंस्था/ बुसान (द. कोरिया)
विश्व टेबल टेनिस सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. मनिका बात्राच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला टेटे संघाला चीन तैपेईकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. तर पुरुषांच्या विभागात द. कोरियाने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.









