वृत्तसंस्था/ सोफीया (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 75 व्या स्ट्रेंजा स्मृती आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या मुष्ठीयुद्ध स्पर्धेत पहिल्याच दिवशी पुरूषांच्या 60 किलो वजन गटात पहिल्या फेरीत भारतीय मुष्ठीयोद्धा आकाश गुरखाला पराभव पत्करावा लागला. उझबेकच्या ए. दिलशोदने आकाश गुरखाचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या 66 किलो गटात भारताच्या अरुंधती चौधरीची सलामीची लढत फ्रान्सच्या ईमेली बरोबर तर पुरूषांच्या 51 किलो गटात राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमित पांगलची लढत युक्रेनच्या मेकसिम बरोबर बुधवारी होणार आहे. या स्पर्धेमध्ये 27 देशांचे सुमारे 300 स्पर्धक सहभागी झाले आहेत.









