महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याच्यामुळे आपल्या जीवाला धोका असून आपल्यावर हल्ला करण्याचा श्रीकांत शिंदे यांनी “सुपारी” दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाकरे गटाचे (UBT) खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे पोलिसांनी खासदार संजय राउत यांच्याविरुद्ध IPC कलम 153 (A) अंतर्गत तेढ निर्माण करणे, कलम 500 नुसार बदनामी आणि इतर संबंधित कलमांखाली कापूरबावडी पोलिसात प्रथम माहिती अहवाल किंवा एफआयआर नोंदवला. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे हा एफआयआर करण्यात आला आहे.
मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलिस आयुक्तांना खा. संजय राऊत यांनी पत्र लिहले होते.या पत्रात त्यांनी असा दावा केला होता की, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणेतील गँगस्टर राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्यासाठी “सुपारी” दिली आहे.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मला सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांच्या गुंडांकडून अनेक धमक्यांचे फोन येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी, ” माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाणे येथील गुंड राजा ठाकूर याला काम दिले आहे.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








