बघ्यांची गर्दी, वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
येळ्ळूर : जंगल तोडीमुळे जंगलातील प्राणी वसाहतीकडे येण्याच्या घटना वाढत आहेत. मंगळवारी येळ्ळूरमध्ये नागरी वसाहतीत चक्क हरिण आल्याने एकच खळबळ उडाली. येळ्ळूर येथील लक्ष्मी तलावाशेजाऊन आलेले हरिण सुभाष गल्लीमार्गे सिद्धेश्वर मंदिरकडे गेले. त्यानंतर ते थेट एका घरात शिरले. तेथील तऊणाने तातडीने त्याला धरले. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या हरणाला एका खोलीमध्ये ठेवण्यात आले. हरिण पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनंत माऊती परीट यांच्या घरात हे हरिण शिरले आणि त्यांचा मुलगा मनोज याने त्याला पकडून काही तऊणांनी त्या हरणाचे पाय बांधले. हरणाच्या डोक्मयाला किरकोळ दुखापत झाली होती. हरिण सापडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे आरएफओ पुऊषोत्तम रावजी आणि डेप्युटी आरएफओ विनय गौडर, गार्ड मल्लिकार्जुन जोतण्णावर, महंमद किल्लेदार हे वाहनासह दाखल झाले. त्यानंतर ते हरिण बेळगाव येथील पशु वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. नंतर भुतरामहट्टी येथील प्राणिसंग्रहालयाकडे त्या हरणाची रवानगी करण्यात आली.









